DD चैनल वर होणार पहिली ते आठवी ऑनलाइन शिक्षण,20 जुलाई पासून होणार सुरु.

  

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ ; २० जुलैपासून उपक्रम दूरचित्र वाहिनीद्वारे शिक्षण.*२० जुलैपासून ‘टिलीमीली’ मालिकेद्वारे दिले शिक्षण
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम.


*पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमाचा समावेश.


*एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन द्वारे मालिक प्रक्षेपित होणार .


*2 करोड़ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना होणार लाभ.

                  मुंबई :कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने राज्यातील शाळा महाविद्यालये संपूर्ण जून उलटूनही बंद आहे 14 मार्च पासून महाराष्ट्रातील सर्व विद्यालय लॉक डाउन मुळे बंद आहेत आणि ते कधी उघड़तील या बाबत अजुनही अनिश्चिता आहे या महामारी परिस्थित विद्यार्थना ऑनलाइन शिक्षण मिलावे या साठे विविध अवलंब विचार शिक्षण विभाग कडून केले जात आहेत , काही शाळांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू केली आहे. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोन आणि इतर वेगवेगळ्या कारणांनी लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे पुण्यातील एमकेसीएलतर्फे  पहिली ते आठवीच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर २० जुलैपासून ‘टिलीमीली’ मालिकेद्वारे दिले जाणार असून, राज्यभरातील दीड कोटी विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार असल्याचा विश्वास राज्यातील शाळा,शिक्षण विभागाच्या निर्णय नुसार शाळांच्या परीक्षाही रद्द करून विद्यार्थांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे जूनच्या मध्यावधीपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी यंदा कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू झालेल्या नाही,काही खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअथसहाय्य शाळांनी आॅनलाइन पद्धतीने वर्ग सुरू केले असून, विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. मात्र, ऑनलाइन वर्गांसाठी आवश्यक असलेली यंत्रणा सर्वच विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थांचे नुकसान होत आहे, त्यामुळे पालकांना विद्यार्थांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता सतावू लागली आहे व ऑनलाइन खर्च सुधा त्यांना झेपवल्या जाणार नही त्या मुळे एमकेसीएलनी हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आहे असे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एमकेसीएलन शासनाच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर मालिकेद्वारे देण्याचा निर्णय घेतला आहे.

एकूण सर्व 480 एपिसोड आसतील ही मालिक 20 जुलाई ते 26 सेप्टेम्बर 2020 पर्यंत असणार आहे रोज सकाळी तर संध्याकाळी वेळा पत्रा नुसार शिकवले जाईल काळी सविस्तर माहिती दिली आहे
*टिलीमिली' मालिकेचे वेळापत्रक*
सकाळी साडे सात ते आठ वाजता - इयत्ता आठवी
सकाळी आठ ते साडे आठ - इयत्ता सातवी
सकाळी नऊ ते साडे नऊ - इयत्ता सहावी
सकाळी साडे नऊ ते दहा - इयत्ता पाचवी
सकाळी दहा ते साडे दहा - इयत्ता चौथी
सकाळी साडे दहा ते अकरा - इयत्ता तिसरी
सकाली साडे अकरा ते दुपारी बारा - इयत्ता दुसरी
दुपारी बारा ते साडे बारा- इयत्ता पहिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या